कार खरेदी करण्यापूर्वी समजून घ्या ,पीडीआय काय असतं? जाणून घ्या फायदे!

0
5

पीडीआयचा अर्थ प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन. ही एक प्रक्रिया आहे. ज्यात कार खरेदी करणारा नवी कार खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण तपासणी करून घेतो. या तपासणीत बाहेरील आणि अंतर्गत भागांची व्यवस्थित तपासणी केली जाते. प्रत्येक ग्राहकाने कारची डिलिव्हरी करण्यापूर्वी पीडीआय करणं आवश्यक आहे.

कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी पीडीआय करणं आवश्यक आहे. यामुळे कार योग्य अवस्थेत आहे की नाही याची तपासणी करता येते. जर काही बिघाड असेल तर ते नोंदवून डिलरशीपला सांगितलं जातं. यामुळे डिलरकडे दुसऱ्या कारची मागणी करता येऊ शकते.

पीडीआय न केल्यास भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण पीडीआयमध्ये कारमधील बिघाड आधीच लक्षात येऊ शकतो. डिलिव्हरीनंतर तो बिघाड समोर आल्यास अडचण येऊ शकते.
पीडीआयदरम्यान कारची बॉडी, रंग, खिडकी, हेडलाइट्स आदी सर्व भागांची तपासणी केली जाते. अनेकदा डिलरकडे असलेल्या डॉकयार्डमध्ये कारवर स्क्रॅच येऊ शकतात. अशाच डॅमेज कार घेण्यापेक्षा डिलिव्हरीपूर्वी पीडीआय करून घ्यावी.

जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कारबद्दल खूप माहिती नाही आणि तुम्ही बरोबर पीडीआय करू शकणार नाही, तर त्यासाठी तुमच्या प्रोफेशनल व्यक्तीला बोलावू शकता. बाजारात सध्या अनेक कंपन्या पीडीआय करण्याचे पैसे घेतात, यामुळे भविष्यात होणाऱ्या त्रासातून मुक्तता होऊ शकते.