सैफ अली खानवर हल्ला; घरात काम करणारे ३ जण ताब्यात

0
466

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी त्याच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खानवर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता पोलिसांनी त्याच्या घरात काम करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या ड्रायव्हर आणि इतरांना ताब्यात घेतले. तिघांना ताब्यात घेतल्यानंतर, त्यांना पोलीस ठाण्यात नेलं जिथे त्यांची चौकशी केली जाईल. मोलकरणीवर आधी हल्ला झाला. मोलकरीण आणि हल्लेखोर यांच्यातील भांडणाचा आवाज ऐकून सैफ त्याच्या खोलीतून बाहेर आला, त्यानंतर हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला.

 

सैफ अली खानवर धारदार शस्त्राने सहा वेळा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या मानेवर, डाव्या मनगटावर, छातीवर जखमा झाल्या. एवढंच नाही तर मणक्यालाही दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे ऑपरेशन आवश्यक असल्याचंही सांगितलं.

 

सैफ अली खानच्या घराचे आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात आहे. करीना कपूर आणि तिची मुलं सुरक्षित आहेत. मुंबई पोलिसांनी घटनेची पुष्टी केली त्यानंतर अधिकृत निवेदन जारी करण्यात आले. घटनेनंतर सैफला उपचारासाठी लीलावती येथे नेण्यात आलं होतं आणि त्यानंतर आरोपीची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा वापर केला जात आहे.