आटपाडी : भाजप तालुकाध्यक्षपदी कुणाची वर्णी? चौघे इच्छुक

0
2662

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुका भाजपच्या अध्यक्षपदी कुणाची निवड होणार? याबाबत कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सध्या, भाजप सत्तेत असल्याने या निवडीकडे गांभीर्याने बघितले जात आहे. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता, भाजप तालुकाध्यक्षपदी जयवंत सरगर, दादासाहेब हुबाले, महादेव पाटील, प्रणव गुरव यांच्या पैकीच एकाची निवड होण्याची दाट शक्यता आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच महत्वाच्या असणाऱ्या आटपाडी नगरपंचायतीच्या निवडी होणार असल्याने, भाजप तालुकाध्यक्षाला महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. त्यामुळे या पदावर आपली निवड व्हावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

 

आटपाडी तालुका भाजपच्या तालुकाध्यक्ष बदलाच्या हालचालीत पुन्हा एकदा अध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी सभापती पुष्पाताई सरगर यांचे पती जयंतर सरगर, बाजार समितीचे संचालक दादासाहेब हुबाले, जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष महादेव पाटील व युवा मोर्चाचे तालुकाप्रमुख प्रणव गुरव आदी शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे. या चौघापैकी अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे तालुक्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. यापूर्वी जयवंत सरगर यांनी तालुकाध्यक्षपद भूषविले होते.

 

आटपाडी तालुक्यात यापुर्वी जयवंत सरगर यांच्या रूपाने ‘ओबीसी’ चेहरा मिळालेला होता. जयवंत सरगर यांनी गोपीचंद पडळकर आमदार असताना पक्ष संघटना मजबुतीसाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यांच्या परंतु सध्या बाजार समितीचे संचालक असलेले दादासाहेब हुबाले व जयवंत सरगर यांच्यातच तालुकाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच होणार असल्याचे बोलले जात आहे.
निवडीसाठी तालुक्यात कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. वरिष्ठांकडे काहींनी मागणी देखील केली आहे. आगामी काळात निवडणुकांच्या तोंडावर स्थानिक पातळीवर अडचण नको, म्हणून तालुकाध्यक्ष पदाचे नाव वरिष्ठ पातळीवरून घोषित होण्याची शक्यता असल्याने जयवंत सरगर, दादासाहेब हुबाले, महादेव पाटील, प्रणव गुरव यांची नावे पाठविली गेली असल्याचे खात्रीलायक वृत्त असले, तरी दादासाहेब हुबाले यांचे नाव मात्र आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here