आटपाडी : शेटफळे वीज उपकेंद्राचा प्रश्न थेट विधानसभेत

0
945

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील वीज केंद्राचा प्रश्न थेट विधानसभेत आमदार सुहास बाबर यांनी विचारला. त्यामुळे या वीज उपकेंद्राचा प्रश्न लवकरच निकाली निघणार असून, यामुळे शेटफळे परिसरातील अकरा गावातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

शेटफळे परिसरातील शेतकऱ्यांना विजेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत शेटफळे येथे ३३केव्ही चे वीज उपकेंद्र मंजूर झाले होते. या ठिकाणी या वीज उपकेंद्राचे काम संपले असून, सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथील वनविभाग मधून तीन वीजेचे खांब टाकण्याचे राहिले होते. या ठिकाणी वनविभागाकडून सदर कामाला अद्याप परवानगी मिळाली नसल्याने सदरचे वीज उपकेंद्र अद्याप सुरु झाले नसल्याने शेटफळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेचा प्रश्न गंभीर बनला होता.

 

सदरच्या वीज उपकेंद्रा बाबत आज खानापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्दाबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी आमदार सुहास बाबर म्हणाले, महावितरण कडून ३.५ कोटी रुपये खर्च करून ३३ केव्ही वीज उपउपकेंद्र उभारणी करण्यात आली आहे. परंतु पाचेगाव येथील वन विभागाकडून तीन खांब टाकण्यासाठी अद्याप परवानगी मिळाली नाही. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वनविभागाला सदर कामाच्या बाबर परवानगी देण्यात यावी अशी मागणी आम. सुहास बाबर त्यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे केली.