
माणदेश एक्सप्रेस न्यूज | आटपाडी : आटपाडी शहरातील गजबजलेल्या सिद्धनाथ चित्र मंदिर चौकात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एस.टी. बसच्या चाकाखाली सापडून पूजारवाडी (ता. आटपाडी) येथील बाळू मोटे (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
आज आटपाडीचा आठवडी बाजार असल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर सकाळपासूनच मोठी रहदारी होती. याचदरम्यान आटपाडी आगाराची एस.टी. बस दिघंचीहून आटपाडी बसस्थानकाकडे येत होती. बस सिद्धनाथ चौकात चांडवले कापड दुकानासमोर आल्यावर दुर्दैवी अपघात घडला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून मागून आलेले बाळू मोटे हे एस.टी. बसच्या अत्यंत जवळ आले. दुर्दैवाने ते थेट बसच्या मागील चाकाखाली सापडले. अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी क्षणातच मोठी गर्दी जमली. पाहणाऱ्यांच्या डोळ्यांसमोर घडलेल्या या भीषण घटनेमुळे वातावरण हळहळून गेले. अपघाताची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
बातमी अपडेट होत आहे