आटपाडी : उंबरगावजवळ अपघातात एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

0
2202
आटपाडी : उंबरगावजवळ अपघातात एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील दिघंची-पंढरपूर मार्गावरील उंबरगाव नजीक दुचाकी व चारचाकी वाहनामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. सदरच्या अपघात हा आज दिनांक १६ रोजी दुपारी 3.०० च्या दरम्यान झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, चिपळूण येथील दोघे जण मोटारसायकल वरून पंढरपूरला निघाले होते. तर पंढरपूरहून दिघंचीच्या दिशेने चारचाकी वाहन येत होते. दोन्ही वाहने उंबरगाव नजीक आल्या नंतर दोन्ही वाहनामध्ये अपघात झाला. यामध्ये दुचाकी वरील सागर मोरे (रा. चिपळूण) यांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची नोंद आटपाडी पोलिसात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here