आटपाडी : दिघंचीच्या सुवर्णकाराची फसवणूक ; दोघांना अटक ; पाच दिवसांची पोलिस कोठडी

0
41

माणदेश एक्सप्रेस न्युज : जत : आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील एका सुवर्णकारास सोने देतो, असे सांगून खोटे सोने देऊन १ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली होती. याबाबत सुर्वणकार भीमराव निवृत्ती गोंजारी (रा. दिघंची) यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित जेताराम केसाजी राम (रा. दईपुर, ता. राणीवाडा जि. जाल्होर, राजस्थान, सध्या रा. जत) व सरवन मोताजी सोळंकी (रा. सिंद्री, ता. बाळोत्रा, जि. बाळोत्रा, राजस्थान, सध्या रा. जत) या दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि.१० मे रोजी वळसंग रोड पंपापासून २०० मीटर अंतरावर व्यापारी भीमराव गोंजारी यांना स्वस्तात सोने देतो, असे सांगून त्यांना त्य ठिकाणी बोलावून घेतले. परंतु त्यांना खोटी सोन्याची चेन देऊन गोंजारी यांच्याकडून १ लाख रुपये घेऊन तसेच त्यांच्या हातातील २५ हजार किमतीची ४ गॅम वजनाची सोन्याची अंगठी ही पुन्हा भेटल्यावर देतो, असे सांगून ती गोंजारीकडून घेऊन ती परत केली नाही. असे एकूण १ लाख २५ हजार रकमेची फसवणूक केली. याबाबत सुर्वणकार भीमराव गोंजारी यांनी यांनी जत पोलिसात तक्रार दिली आहे.