
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : दि. आटपाडी एज्युकेशन सोसायटी, आटपाडी यांच्या इयत्ता दहावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षेत यंदाही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत संस्थेचा निकाल उज्ज्वल केला आहे. संस्थेच्या ३१ हायस्कूलपैकी ९ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला असून सर्वच शाळांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
संस्थेचा पुणे विभागीय बोर्ड निकाल ९४.८१ टक्के, कोल्हापूर बोर्ड निकाल ९६.७८ टक्के, तर एकूण संस्थेचा सरासरी निकाल ९४.८१ टक्के इतका आहे. या यशामुळे संस्था, विद्यार्थी, शिक्षक, पालक व स्थानिक समाजामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
श्री भवानी हाय. आटपाडी ९५.७१, दिघंची हाय. दिघंची ९५.२३, श्रीमती व.दे. गर्ल्स हाय. आटपाडी ९८.२३, पं.ज.ने. हाय. शेटफळे ९२.५९, दिघंची गर्ल्स हाय. दिघंची ९८.८२, शेटफळे गर्ल्स हाय. शेटफळे १००, श्री छत्रपती शिवाजी हाय. नेलकरंजी १००, श्री गजानन हाय. गोमेवाडी ९३.४७, श्रीराम हायस्कूल करगणी ८७.८५, लोकमान्य हायस्कूल निंबवडे ९४.२८, महात्मा गांधी विद्यालय कौठूळी १००, श्रीमंत बाबासाहेब देशमुख हाय. बनपुरी ८६.३१, विभूतवाडी हायस्कूल विभूतवाडी ९६.००, देशमुखवाडी हाय. देशमुखवाडी १००, आवळाई हाय. आवळाई १००, करगणी गर्ल्स हाय. करगणी १००, तळेवाडी हायस्कूल तळेवाडी ९३.१०, बहादुरवाडी हाय. बहादुरवाडी ९८.८५, विठलापूर हाय. विठलापूर १००, पिंपरी बु.।। हाय. पिंपरी बु. ८३.३३, वलवण हायस्कूल वलवण ९०.९०, न्यू इंग्लिश स्कूल लेंगरेवाडी-माडगुळे १००, डायनॅमिक इंग्लिश मेडीयम स्कूल आटपाडी १००, बलवडी हायस्कूल बलवडी ९६.६६, दौलतराव विद्यालय कासेगांव ८०.१२, जवाहरलाल शेतकी विद्या. पिलीव ९३.८७, खवासपूर हाय. खवासपूर ९३.९३, श्री छत्रपती शिवाजी विद्या. मुंढेवाडी ९२.८५, श्री य.च. हाय. वरकुटे-मलवडी ९५.००, पानवन हायस्कूल पानवन ९२.३०, आटपाडी माध्यमिक विद्यालय आटपाडी १०० टक्के असा निकाल आहे.
दि. आटपाडी एज्युकेशन सोसायटी गेली अनेक वर्षे ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच मार्गदर्शन, वेळोवेळी सराव परीक्षा, प्रश्नसंच, विशेष अभ्यास वर्ग व शिक्षकांचे सातत्याने मूल्यवर्धन या गोष्टींवर संस्था भर देते. या घवघवित यशाबद्दल दि. आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. गावकरी, माजी विद्यार्थी, पालक व शिक्षण प्रेमी नागरिकांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करत सर्वांचे कौतुक केले आहे.