
आटपाडी/प्रतिनिधी : गेली अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या आटपाडी नगरपंचायतच्या विकास आराखड्याला अखेर आमदार सुहास बाबर यांच्या मागणीमुळे स्थगिती मिळाली असून आता नागरिकांच्या मागणीप्रमाणे व सर्वांना सामावून घेत नवीन विकास आराखडा तयार केला जाणार आहे. पूर्वीच्या जुन्या विकास आराखडयाला स्थगिती मिळावी यासाठी आमदार सुहास बाबर यांनी याबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. त्यावर नगरविकास खात्याने सदर विकास आराखड्याला स्थगिती दिल्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे आमदार सुहास बाबर यांच्या आग्रही मागणीला यश आले आहे.
विकास आराखडा रद्द निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा
Atpadi_Nagarpanchayt_Vikas_Aarakhada