आटपाडी शहर प्रदूषणमुक्तीसाठी योगदान द्यावे : वैभव हजारे

0
274

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील स्वच्छतेतील नागरिकांची भूमिका आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पंचमहाभूतांचे जतन करणे ही आपल्या सर्व नागरिकांची जबाबदारी व कर्तव्य असून आपल्या येणाऱ्या पिढीसाठी हरित व प्रदूषण मुक्त शहर निर्माण करण्याकडे आपण सर्वांनी योगदान देणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव हजारे म्हणाले.

 

 

स्वच्छ सर्वेक्षण 2024 व स्वच्छ भारत अभियान च्या शर्यतीत आटपाडी शहर अग्रेसर रहावे व स्वच्छतेची गुढी शहरात उभे राहावी याकरिता नगरपंचायतच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगाने आटपाडी नगरपंचायत आयोजित भव्य पारितोषिक वितरण समारंभ काल दिनांक ०७ रोजी श्री कल्लेश्वर मंदिर येथील सभागृहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

 

 

स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत आटपाडी नगर पंचायत मार्फत स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन याविषयी स्वच्छ आस्थापना स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वच्छ शाळा स्पर्धा, स्वच्छ हॉस्पिटल, स्वच्छ शासकीय कार्यालय व स्वच्छ हॉटेल इत्यादी विविध स्पधांचे आयोजन केले होते. यामध्ये सर्व आस्थापनांचे स्वच्छता विषयक स्वच्छ सर्वेक्षणच्या दिलेल्या घटकांनुसार मूल्यांकन करण्यात आलेले होते व अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असे गुणांकन करून विजेते स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

 

 

 

तसेच विविध शाळा महावि‌द्यालयातील विद‌यार्थ्यांकरिता चित्रकला व निबंध स्पर्धा देखील घेण्यात आल्या होत्या याचे देखील मूल्यांकन करुन विजेते स्पर्धक यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आटपाडी नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना स्वच्छता व पर्यावरण संवर्धन संदर्भात जनजागृती व्हावी तसेच विद्‌याथ्यांच्या मनावरती स्वच्छतेचे संस्कार रुजू व्हावेत याकरिता अशा विविध उपक्रमातून नगरपंचायत पुढे वाटचाल करत आहे.

 

 

 

सदर कार्यक्रमास पोलीस स्टेशन आटपाडी येथील एपीआय विशेंद्रसिंह बायस, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र खरात, कलेश्वर मंदिराचे अध्यक्ष प्रदीप पाटील, आटपाडी कॉलेजचे प्रा. श्री. मोरे, आरोग्य निरीक्षक श्री. बंडगर, प्रशासकीय अधिकारी श्री पुंदे. शहर समन्वयक श्री. संतोष, नगरपंचायत कर्मचारी व अधिकारी वृंद, स्पर्धेतील विजेते व सहभागी स्पर्धक, दिव्यस्वप्न फाउंडेशन चे अमर लोखंडे, सुरज गायकवाड, गौरव म्हेत्रे इत्यादी सर्वजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वसुंधरा हरित शपथ घेऊन करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here