
माणदेश एक्सप्रेस/पुणे : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलं आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर आला आहे. नैतिकतेच्या दृष्टीने धनंजय मुंडे यांनी राजीनाम द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. विरोधकांचे हे प्रश्न पत्रकारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी राजीनामाप्रकरणी मुंडेंनाच प्रश्न विचारा, असं म्हटलं आहे.
“आर. आर. पाटील आणि विलासरावांनी राजीनामा दिला होता. मग ही नैतिकता धनंजय मुंडे का दाखवत नाहीत?” असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, “आपण त्यांनाच प्रश्न विचारा. तुमच्या आमच्या पक्षाचं असं काही नसतं. तेही काही गोष्टी बघत असतील ना. त्यांचं म्हणणं आहे की माझा दुरान्वयेही संबंध नाही.” असं म्हणत अजित पवारांनी राजीनामा चर्चावर हात झटकण्याचा प्रयत्न केला.