
माणदेश एक्सप्रेस न्यूज | क्रीडा प्रतिनिधी
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आशिया कप 2025 मध्ये दमदार सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. 9 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या टी20 स्पर्धेत भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यजमान संघ यूएई विरुद्ध होणार आहे.
बीसीसीआयने सर्व खेळाडूंना 4 सप्टेंबरपर्यंत दुबईला पोहोचण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल टीम इंडिया दुबईत दाखल झाली असून आजपासून (5 सप्टेंबर) आयसीसी अकादमीमध्ये पहिले सराव सत्र सुरू झाले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने हा आशिया कप भारतीय संघासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या स्पर्धेत भारताला पूल ए मध्ये स्थान मिळाले असून या गटात यूएई, ओमान आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. पहिल्या लढतीत भारताची गाठ यूएईशी पडणार असली तरी, पुढील सामने अधिक रोमांचक असतील, कारण पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धची झुंज चाहत्यांसाठी नेहमीच विशेष ठरते.
भारताचा पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळला जाणार आहे. या मैदानावरील टीम इंडियाचा विक्रम जवळपास बरोबरीचा आहे. आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांपैकी भारताने 5 सामने जिंकले तर 4 गमावले आहेत. त्यामुळे यूएईविरुद्धची ही लढत संघासाठी आत्मविश्वास वाढवणारी ठरू शकते.
प्रारंभी सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार होते. मात्र, यूएईतील उष्णतेमुळे आयोजन समितीने सामन्यांची वेळ अर्धा तास पुढे ढकलली आहे.
➡️ त्यामुळे भारत वि. यूएई सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल, तर टॉस संध्याकाळी 7:30 वाज
भारतातील चाहत्यांसाठी आशिया कप 2025 चे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहे.
टीव्हीवर प्रेक्षक सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 चॅनेलवर सामना पाहू शकतात.
तर ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी सोनी लिव्ह ॲप उपलब्ध आहे.
स्मार्ट टीव्ही वापरणाऱ्यांसाठी देखील सोनी लिव्ह ॲपमधून सामना पाहता येणार आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासारखे वरिष्ठ खेळाडू विश्रांतीवर असताना, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ किती प्रभावी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. युवा खेळाडूंना या स्पर्धेतून स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे.