रिबेल स्टार अशी ओळख असलेला प्रभास हा सर्वांचा लाडका अभिनेता. प्रभासच्या विविध सिनेमांमधून भूमिका साकारुन सर्वांचं मन जिंकलंय. प्रभासने ‘बाहुबली’ सिनेमातून भारतात नव्हे तर जगभरात त्याच्या अभिनयाचा डंका वाजवला. प्रभासने कायमच विविध भूमिका साकारुन लोकांना आश्चर्याचा सुखद धक्का देत असतो. प्रभासच्या आगामी सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालंय. या पोस्टरमध्ये प्रभासचा महादेव अवतार पाहून सर्वचजण थक्क झालेत.
सुपरस्टार प्रभासचा आजवरचा वेगळा सिनेमा म्हणून ‘कन्नप्पा’ सिनेमाकडे पाहिलं जातंय. ‘कन्नप्पा’मध्ये याआधी अक्षय कुमारचा महादेवाचा अवतारातील लूक पाहायला मिळाला. आज नुकतंच प्रभासचा भगवान शंकराचा रुपातील फोटो व्हायरल झालाय. यात कपाळी भस्म, गळ्यात रुद्राक्ष असलेल्या लूकमध्ये प्रभास बघायला मिळतोय. प्रभासचा हा महादेवाचा लूक समोर येताच चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
‘कन्नप्पा’ सिनेमा हा साउथचा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाची रिलीज डेटही अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलीय. हा सिनेमा २५ एप्रिल २०२५ ला रिलीज होणार आहे. ‘कन्नप्पा’ हा एक काल्पनिक सिनेमा असून शिवभक्त कन्नप्पावर हा सिनेमा आधारीत आहे. या सिनेमात अक्षय कुमार झळकणार असून या सिनेमाच्या माध्यमातून अक्षय कुमार तेलुगु सिनेमाइंडस्ट्रीत पदार्पण करतोय. प्रभासही या सिनेमात झळकणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला आहे. विशेष म्हणजे दोघंही सुपरस्टार महादेवाच्या भूमिकेत दिसणार आहेत.