
माणदेश एक्सप्रेस न्यूज |
पावसाळा म्हणजे निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्याचा काळ! पण या ऋतूसोबत सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यांसारख्या आजारांचीही चलती सुरू होते. वातावरणातील आर्द्रतेमुळे आणि तापमानातील बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि आपण सहज आजारी पडतो. अशावेळी सतत औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी एक घरगुती उपाय खूप उपयोगी ठरतो – आजींचा खास काढा!
❖ का होतो पावसाळ्यात त्रास?
पावसाळ्यात वातावरणात वाढलेली आर्द्रता ही विविध विषाणू आणि जंतूंना वाढीस लागण्यासाठी पोषक ठरते. त्यातून सर्दी, खोकला, घसा दुखणे आणि ताप अशा लक्षणांची सुरुवात होते. घरात लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक यांना याचा विशेष त्रास होतो.
आजीनचा जालीम उपाय – घरगुती काढा
आजोबांच्या वेळापासून घराघरात वापरला जाणारा हा काढा नैसर्गिक, प्रभावी आणि शरीरासाठी सुरक्षित आहे.
लागणारे साहित्य:
आले (१ इंचाचा तुकडा) – दाह कमी करतं, घशाची सूज उतारते.
तुळशीची ८-१० पाने – रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
काळी मिरी (४-५ दाणे) – कफ कमी करते.
लवंग (२-३) – अँटीसेप्टिक गुणधर्म.
गूळ (छोटा तुकडा) – उष्णता देतो.
मध (१ चमचा – कोमट झाल्यावर टाका) – खोकला थांबवतो, घशाला आराम देतो.
पाणी (२ कप)
काढा तयार करण्याची पद्धत:
एका पातेल्यात २ कप पाणी गरम करा.
त्यात आले किसून टाका.
तुळशीची पाने, काळी मिरी, लवंग घालून १०-१५ मिनिटे उकळा.
उकळून हे पाणी अर्धं शिल्लक राहील इतकं उकळवा.
पाणी गाळा. कोमट झाल्यावर मध टाका.
गरम गरम काढा हळूहळू प्या.
फायदे:
सर्दी, खोकला, घसा खवखवणे यावर त्वरित आराम.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
कफ आणि बंद नाक कमी करतो.
शरीराला उष्णता देतो, थंडीपासून संरक्षण करतो.
कधी प्यावा?
दिवसातून दोन वेळा – सकाळी आणि झोपण्यापूर्वी.
लहान मुलांना देताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.
काही गोष्टी लक्षात ठेवा:
फारच ताप, अंगदुखी, फोड, श्वास घेण्यास त्रास असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
काढा जास्त प्रमाणात पिऊ नका, प्रमाणित आणि वेळेवर सेवन करा.