
skin care tips : चेहऱ्यावर नैसर्गिक तेज आणि इंस्टंट ग्लो मिळवण्यासाठी अनेक जण महागडी सौंदर्य प्रसाधने वापरतात. मात्र, स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेला बीटरूट (बीट) हा चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या बीटरूटचा वापर त्वचेसाठी केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक उजळपणा दिसून येतो, असं तज्ज्ञ सांगतात.
बीटरूटचा वापर त्वचेसाठी करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. प्रथम बीटरूटचे काप करून मिक्सरमधून त्याचा रस काढा. त्यात १ चमचा कॉफी पावडर मिसळा. हा लेप चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. हा स्क्रब त्वचेवरचे डेड स्किन आणि टॅनिंग दूर करतो. तसेच ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी होण्यास मदत करतो.
यानंतर बीटरूटच्या रसात थोडे गव्हाचे पीठ आणि बेसन मिसळून फेसमास्क तयार करा. हा फेसमास्क चेहऱ्यावर १० ते १२ मिनिटांसाठी लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा नैसर्गिक उपाय एकदाच केल्यानंतर त्वचेमध्ये ताजेपणा आणि ग्लो सहज दिसून येईल, असं सांगितलं जात आहे.
त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, रसायनमुक्त आणि नैसर्गिक उपायांमुळे त्वचेला कोणतीही साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता कमी असते. मात्र, कोणताही फेसमास्क किंवा स्क्रब वापरण्यापूर्वी त्वचेची चाचणी करून पाहणे गरजेचे आहे.