माणदेश एक्सप्रेस न्युज :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार का? याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रतिक्रिया दिली आहे. मी ज्योतिष नाही, राजकारणात काहीही होऊ शकतं असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. त्यामुळं अजित पवार यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
एबीपी माझाच्या महाराष्ट्र माझा माझा व्हिजन या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का? यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, तुम्हाला वाटलं होतं का, काँग्रेस शिवसेना एकत्र येईल.
राजकारणात चढ उतार येत असतात. जमिनीवर पाय ठेवून काम करायचं असते असेही अजित पवार म्हणाले. यश मिळालं तरी हुराळून जायचं नसतं, अपयश आलं तरी खचून जायंच नसतं असेही अजित पवार म्हणाले. आमचं सरकार लोकाभिमुख कारभार करत असल्याचे अजित पवार म्हणाले.