माणदेश एक्सप्रेस न्युज : सध्या सोशल मीडियावर बालवाडीची एक फी पावती खूप व्हायरल होत आहे. ही पावती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे नर्सरीची फी. ही फी नर्सरीची की इंजिनिअरींगची, असा प्रश्नदेखील नेटकऱ्यांना पडला आहे.
एका वेळच्या पालक मिटिंगसाठी तब्बल ८४०० रुपयांची फी आकारण्यात आली आहे. तर प्रवेश शुल्क ५५,६०० रुपये आकारण्यात आला. आता ही फी पाहून तुम्हाला वाटेल ही फी एखाद्या इंजिनिअरिंगची कॉलेजची असेन परंतु ही फी ज्युनिअर केजीची आहे. फी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“रु. ८,४०० पालक मिटिंगची फी! कोणताही पालक डॉक्टर तपासणीसाठी यातून २० टक्के पैसे देण्यास देखील तयार होणार नाही,” डॉ जगदीश चतुर्वेदी, एक ईएनटी सर्जन, यांनी X वर लिहिले की, “मी आता शाळा उघडण्याचा विचार करत आहे.” त्यांच्या या पोस्टला जवळपास ६७,००० व्ह्यूज मिळालेत. त्यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देतांना ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विनीत गोविंदा गुप्ता म्हणाले, लोक त्यांच्यावर कधीच खर्च केला नसेल तर तितका खर्च आपल्या मुलांवर करतात.