आटपाडीत चारचाकी वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

0
1929

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील बाजार समितीचे बाजार पटांगण या मार्गावर सुरेश इंडेन गॅस जवळ चारचाकी वाहनाने धडक दिल्याने देशमुखवाडी येथील वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आटपाडी पोलिसात सदर घटनेची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक २४ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास, बाजार समितीचे बाजार पटांगण या मार्गावर सुरेश इंडेन गॅस या मार्गावर भगवान बापू भानवसे (वय ६५) रा .देशमुखवाडी, भानवसेवस्ती हे जात होते. यावेळी अकबर हसन मुलाणी हा त्याच्या ताब्यातील बोलोरो (एमएच१०सीआर३७८५) गाडी रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करून वेगाने चालला होता. यावेळी त्याने भगवान बापू भानवसे यांना धडक दिली.

या धडकीमध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी आटपाडी पोलिसात आरोपी चालक, अकबर हसन मुलाणी याच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here