अमिताभ बच्चन KBC च्या जबाबदारीतून मुक्त होणार?; आता ‘हा’ सुपरस्टार होणार नवीन होस्ट

0
36

माणदेश एक्सप्रेस न्युज| मुंबई : २००० पासून लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) चे अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ताज्या मीडिया रिपोर्टनुसार, वैयक्तिक कारणांमुळे अमिताभ बच्चन लवकरच KBC च्या सूत्रसंचालनातून माघार घेऊ शकतात.

 

अमिताभ बच्चनच्या जागी या शोचा होस्ट म्हणून बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान येऊ शकतो, अशी चर्चा जोर धरत आहे. सध्या सलमान खान आणि शो निर्मात्यांमध्ये आर्थिक अटींबाबत चर्चा सुरु असल्याचे समजते. जर सर्व काही सुरळीत झाले, तर सलमान खान पुढील सीझनमध्ये KBC चे सूत्रसंचालन करणार असल्याची शक्यता आहे.

 

सलमान खान यांना बिग बॉस आणि दस का दम यांसारख्या रिअॅलिटी शोच्या होस्टिंगचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे आणि प्रेक्षकांशी असलेल्या चांगल्या संवादामुळे त्यांना KBC साठी योग्य उमेदवार मानले जात आहे.
अमिताभ बच्चन यांनी मार्च २०२५ मध्ये KBC चा १६ वा सीझन पूर्ण केल्यानंतर पुढील सीझनबाबत संकेत दिले होते, पण आता त्यांच्या जागी कोण येणार यावर चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चा वाढली आहे.

 

KBC चे मेकर्स लवकरच या बदलाबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here