पिवळे दात मोत्यांसारखे चमकदार बनवण्यासाठी तुरटी आणि लवंग ठरेल वरदान, एकदा कराच…

0
161

पिवळसर पडलेले दात कोणालाही अडचणीत आणू शकतात. अशा वेळी वेगवेगळ्या टूथपेस्ट्स, महागड्या उपाययोजना करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. मात्र, आयुर्वेदात अशा समस्यांसाठी एक अत्यंत सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे – तुरटी आणि लवंग यांचे मिश्रण!

 

आयुर्वेद डॉक्टर उपेंद्र बहादुर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दात पांढरेशुभ्र आणि चमकदार करण्यासाठी तुरटी आणि लवंग हा उपाय खूप प्रभावी आहे. यामुळे केवळ दातांची चमकच वाढत नाही, तर तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांचे आजार आणि दातांची कीड यावरही नियंत्रण मिळते.

 

कसा कराल हा उपाय?
 अर्धा लिटर पाण्यात ७–८ लवंग टाका.
 त्यात तुरटीचा एक लहानसा तुकडा घालून पाणी ५ मिनिटं तसेच ठेवा.
 हे मिश्रण झाकून ३ दिवसांसाठी ठेवा.
 तयार झालेल्या या पाण्याने दररोज सकाळी ब्रश केल्यानंतर ५–७ मिनिटं गुळण्या करा.
 हा उपाय नियमित केल्यास काही दिवसांतच दातांचा पिवळेपणा कमी होतो आणि दात मोत्यासारखे चमकू लागतात.

 

घरच्या घरी, नैसर्गिक उपाय
दातांच्या स्वच्छतेसाठी हा घरगुती उपाय कोणतेही रसायन न वापरता परिणामकारक ठरतो. आजच्या यांत्रिक आणि धकाधकीच्या जीवनात नैसर्गिक आणि सोपे उपाय स्वीकारणे अधिक फायदेशीर ठरते, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here