
निरोगी राहण्यासाठी आपल्याला निरोगी आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. आहार घेताना त्यात हिरव्या भाज्या आणि फळे समाविष्ट केल्याने शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्वांसह आरोग्याला अनेक फायदे देखील मिळतात. बहुतेक लोकं त्यांच्या आहारात सकाळच्या नाश्त्यात ड्रायफ्रुट्स समावेश करतात.
अशातच ड्रायफ्रुड्समध्ये असलेल्या खजूरांबद्दल बोलायचे झाले तर खजूराचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे एक गोड, मऊ असे ड्रायफ्रुट्स फळ आहे. यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक आवश्यक खनिजे भरपूर प्रमाणात असतात. खजूर खाल्ल्याने केवळ पचन सुधारत नाही तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. म्हणूनच तज्ञ दररोज एक ते दोन खजूर खाण्याची शिफारस करतात. मात्र खजूर खाण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, अन्यथा तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागेल.
खजूरात आत लपलेले असते फंगस
अमेरिकन आरोग्य तज्ज्ञांनी खजूरमध्ये अनेकदा बुरशी लपलेली असू शकते. ते सहसा बाहेरून दिसत नाही. यासाठी तुम्ही जेव्हा खजूराचे सेवन कराल तेव्हा ते कापून खा, अशाने तुम्ही त्यातील बुरशीजन्य संसर्ग ओळखणे सोपे होईल आणि तुम्हाला आरोग्याच्या समस्या टाळत्या येतील.
खजूरांमध्ये बुरशी का असते?
खजूरमध्ये नैसर्गिकरित्या जास्त साखर आणि ओलावा असतो. त्यामुळे त्यात बुरशी येण्याची शक्यता वाढते. कधीकधी बुरशीचा रंग पांढरा, हिरवा, काळा किंवा तपकिरी असू शकतो. काही बुरशी आरोग्याला हानी पोहोचवत नाहीत, परंतु काही अशा आहेत ज्या शरीरात मायकोटॉक्सिन नावाचे विषारी पदार्थ सोडतात. यामुळे अतिसार, उलट्या, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ आणि श्वास घेण्यास त्रास यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ज्या लोकांना बुरशीची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी ते अधिक धोकादायक असू शकते आणि दम्याचा झटका देखील येऊ शकतो.
बुरशीने ॲलर्जी झाल्यावर कोणती लक्षणे दिसतात?
वाहणारे नाक किंवा नाक बंद होणे
खोकला आणि शिंका येणे
डोळे किंवा घसा खाजणे
डोकेदुखी किंवा त्वचेवर पुरळ येणे
श्वास घेण्यास त्रास होणे
थकवा आणि फ्लू
खजूर खाण्याचे फायदे
खजूरामध्ये फायबर भरपूर असल्याने ते पचन सुधारते. बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्यांपासून आराम देते. खजूरात ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज सारखे नैसर्गिक साखर असते. त्यामुळे याचे सेवन केल्याने तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळते.
दररोज खजूर खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यात असलेले कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
खजूरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस देखील चांगल्या प्रमाणात आढळतात. ते हाडे मजबूत करतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका देखील कमी करतात.
जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान खूप वेदना होत असतील तर खजूर खाल्ल्याने वेदना कमी होतात.
खजूर खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता देखील दूर होते. खरं तर, लोह भरपूर असल्याने ते अशक्तपणा टाळता येते.
खजूर आपले हृदय देखील निरोगी ठेवते. खजूर खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.
या गोष्टी लक्षात ठेवा
खजूर खा, पण खाण्यापूर्वी त्यांना नीट स्वच्छ करा आणि आत काही बुरशी आहे का ते तपासण्यासाठी कापून घ्या. स्वच्छ आणि सुरक्षित खजूर खाल्ल्यानेच तुम्हाला त्याचे सर्व फायदे मिळू शकतात.
खजूर खाण्याची योग्य पद्धत?
खजूर हे पोषक तत्वांनी समृद्ध असतात. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी 3 ते 4 खजूर खावेत. यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)