अजितदादांचा मोठा डाव; एकाच डावात ठाकरे गट व शिंदे गटाला जोरदार झटका

0
323

माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे 
राजकारणात आज मोठी हलचल झाली असून, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाडच्या चांदे मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात नवे वादळ उठण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

स्नेहल जगताप या पूर्वी शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात सक्रिय होत्या. त्यांचा राष्ट्रवादीत झालेला प्रवेश हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्त्वाची मानली जात आहे.

 

विशेष बाब म्हणजे, शिवसेना (शिंदे गट) नेते आणि रायगडचे आमदार भरत गोगावले यांचे त्या मुख्य राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हा प्रवेश शिंदे गटालाही अप्रत्यक्ष झटका ठरत आहे. सध्या रायगडच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. अशा वेळी राष्ट्रवादीकडून स्नेहल जगताप यांना पक्षात घेणे म्हणजे राजकीय डावपेचाचा भाग असल्याचं मानलं जातं. या प्रवेश सोहळ्याला खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

 

महाविकास आघाडीला सुरू झाली गळती
लोकसभा निवडणुकीत यश मिळवलेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. महायुतीने २३२ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवलं. त्यानंतर महाविकास आघाडीतून नेत्यांची गळती सुरू झाली असून, त्याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसताना दिसतो आहे.

 

एकामागून एक नेते भाजप, शिंदे गट किंवा आता राष्ट्रवादीत प्रवेश करत असून, ठाकरे गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here