
माणदेश एक्सप्रेस/पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी आणि बिनधास्त शैलीसाठी ओळखले जातात. आज अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस जवळचे आहेत की एकनाथ शिंदे या प्रश्नाचं क्षणार्धात उत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस जवळचे आहेत की एकनाथ शिंदे? असा प्रश्न अजित पवारांना या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावेळी अजित पवारांनी क्षणार्धात देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे तेच जवळचे. मी सध्या कुणालाच नाराज करणार नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पद्धतीने तर मी माझ्या पद्धतीने चांगले संबंध ठेवले आहेत असंही अजित पवार म्हणाले.