
Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात डान्सचे तर खूपच असतात. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की एखाद्या गाण्यावर डान्स सादर करुन दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. मग कधी घराच्या आजुबाजूच्या मुली किंवा अगदी बहिणी बहिणी एकत्र येऊन काहीतरी भन्नाट सादर करुन जातात. नुकताच सोशल मीडियावर असाच एक डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुली अतिशय भन्नाट अशा डान्स करताना दिसत आहेत
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. ये तो रील्स का जमाना है! असं म्हटलं तरी चालेल. बघावं तिकडे तरुणाई सोशल मीडियासाठी रील्स बनवताना दिसतात. यातील काही रील्स आणि व्हिडीओ नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतात. एखाद्या चित्रपटातील गाण्यावर डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला. की पुढच्या काही क्षणात तो सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये येतो. तसेच आजकाल तरुणाईमध्ये जुन्या मराठी गाण्यांचाही ट्रेंड आहे. आजकालच्या पिढीतही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते. अशाच तीन तरुणींचा मराठमोळ्या गाण्याचावरचा जबरसदस्त असा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ पाहून प्रत्येका तोंडून एकच वाक्य निघतंय क्या बात है.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तिथलं बस्तान आईच्या हाती न तितं बाय दिवसा बी वाटतीय भीती..या मराठमोळ्या गाण्यावर या तरुणींनी डान्स केला आहे. यावेळी तिघींनी साड्या नेसल्या आहेत. त्यांच्या अदा आणि भाव पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या तरुणींचा डान्स हा नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. काय ती अदा, काय तो नखरा, काय ते डान्स स्टेप्स म्हणत दोघींचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकादा पाहून पण नेटकऱ्यांचं मन भरतं नाही आहे. ते हा व्हिडीओ वारंवार पाहतं आहेत. आतापर्यंत या व्हिडीओ लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. पण या व्हिडीओचा क्रेझ काही कमी होतं नाहीय.