
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) ॲड. धर्मपाल मेश्राम हे शनिवार, दि. 5 एप्रिल 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 5 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह इस्लामपूर येथे आगमन. दुपारी 2 वाजता रमाई आवास (घरकुल) योजनेंतर्गत अर्जदार प्रकाश संपत कांबळे बहे ता. वाळवा यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, गट विकास अधिकारी वाळवा पंचायत समिती व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सांगली यांच्या सोबत बहे ता. वाळवा इस्लामपूर येथे बांधकाम पाहणी व आढावा. दुपारी 3 वाजता सांगली येथून सोलापूरकडे प्रयाण.