मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

0
116

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह पलूस येथे सन 2025-2026 करीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्यास मागासवर्ग, अनाथ व अपंग या सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना रिक्त जागेवर विनामुल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वसतिगृह अधिक्षक मनिष पानगांवकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

 

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 11 वी, प्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा व अभियांत्रिकी आय.टी.आयचे नियमित शिक्षण घेत असलेल्या बाहेरगावाकडील/परगावांवरून ये-जा करणाऱ्या (पलूस स्थानिक विद्यार्थी सोडून) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन https://hmas.mahait.org/ या पोर्टलव्दारे सुरू आहे. या पोर्टलव्दारे गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी अर्ज करून अर्जाची प्रत व कागदपत्रे वसतिगृहात जमा करावीत. हे वसतिगृह गुणवंत असल्याने फक्त इयत्ता 11 वी, प्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा व अभियांत्रिकी आय.टी.आय करीता प्रवेश पात्र असेल. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 55 टक्के पेक्षा जास्त गुण आणि उत्पन्न मर्यादा 2 लाख 50 हजार पेक्षा कमी व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 55 टक्के पेक्षा जास्त गुण आणि उत्पन्न मर्यादा 1 लाख पेक्षा कमी आवश्यक असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here