वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम लगतच्या पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळेल. शिवाय पुढील 2-3 दिवसांत, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस () पडण्याची शक्यता आहे. उद्याचे हवामान (Forecast For Tomorrow) काहीसे ढगाळ आणि काही ठिकाणी पावसासाठी पूरक असल्याचे सांगतानाच आयएमडीने उत्तर प्रदेशसह उत्तर-पश्चिमी राज्येही हाय अलर्टवर असल्याचे म्हटले आहे. प्रामुख्याने या राज्यांमध्ये पुढील 5 ते 7 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, दिल्ली-एनसीआर प्रदेशात हलक्या पावसाचा अंदाज येऊ शकतो, ज्यामुळे सध्याच्या आर्द्रतेपासून थोडासा दिलासा मिळेल, असा हवामान अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जम्मू आणि काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हा आठवडा काहीसा अनिश्चित मान्सून पावसाचा असू शकतो. याचा अर्थ असा की, या राज्यांमध्ये अचानक मुसळधार पाऊस कोसळू शकतो. याव्यतिरिक्त, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये लक्षणीय पाऊस अपेक्षित आहे.
दिल्लीचे आजचे हवामान
दिल्लीत सोमवारी हलका पाऊस किंवा रिमझिम पावसासह ढगाळ आकाश राहण्याचा हवामान अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. IMD च्या अंदाजानुसार कमाल तापमान 35 डिग्री सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान सुमारे 27 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात पावसाने बऱ्यापैकी उगडीप दिली आहे. नाही म्हणायला पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत. मात्र, असे असे असले तरी वातावरण कोरडे आणि आकाशही निरभ्र असल्याचे पाहायला मिळत आहे. वातावरण कोरडे असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. तसेच, उकाडाही जाणवू लागला आहे. पाऊस पडत नसला तरी पावसाळा ऋतू सुरु असतानाही जाणवण्याइतपत उकाडा आणि उन्हाच्या झळा यांमुळे नागरिक हैराण असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या पावसामुळे हिरवा चारा निर्माण झाला असला तरी, तीव्र उन्हामुळे तो सुखू लागल्याने जणावरांच्या चाऱ्याचे काय करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
एक्स पोस्ट:
— RWFC New Delhi (@RWFC_ND) August 18, 2024