अपघात: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरच एकामागून एक आदळल्या गाड्या; व्हिडिओ व्हायरल

0
1281

माणदेश एक्सप्रेस न्युज / केरळ 

केरळमधील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची घटना घडली. मुख्यमंत्र्यांचा ताफा तिरुवनंतपुरमच्या वामनपुरमच्या भागातून जात होता. त्यावेळी अपघात झाला. मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना एक स्कुटी चालवणारी एक महिला ताफ्याच्या पुढे आली आणि अचानकपणे टर्न घेतला. त्यामुळे ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या.

केरळचे पिनाराई विजयन यांच्या ताफ्याला गाड्यांची धडक बसल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला स्कूटर चालवत होती. जी अचानक उजवीकडे वळली. त्यानंतर ताफ्यातील एका पांढऱ्या रंगाच्या एसयूव्ही कारच्या चालकाने ब्रेक लावला. त्यामुळे कार थांबली परंतु मागून येणाऱ्या कार एकमेकांवर आदळल्या.

ताफ्यातील पाच गाड्या आणि एक रुग्णवाहिका एकमेकांवर आदळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री विजनय हे कोट्टायमहून परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला.