हॉटेल गीता विहारजवळ अपघात ,वळण घेताना डंपरची महिलेला धडक, उपचारा दरम्यान मृत्यू

0
214

सांताक्रूझ पूर्वेकडील कालिना येथील हॉटेल गीता विहारजवळ एक अपघात घडला. या अपघातात ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी रात्रीच्या वेळीस हा भीषण अपघात घडला. ललिता हंचाटे असं अपघातात मृत झालेल्या महिलेचा नाव आहे. ती रस्त्याच्या कडेला जात असताना अचानक डंपरने ट्रकने धडक दिली. वाकोला पोलिसांनी या प्रकरणी  नोंद घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ़डंपर चालकाने वाहनं बेदरकारपणे चालवत होता. डंपर भरधाव वेगात आला आणि रस्त्यावर चालत असलेल्या महिलेला धडकला. गजानन चैगुले असं डंपर चालकाचे नाव आहे. ललिचा मागिल चाकाखाली येऊन त्यांच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली. महिला घर काम करण्यासाठी कलिना येथे आली होती. त्यावेळी ही घटना घडली.

जवळच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली, त्यांनी घटनास्थळी पोहोचून तिला सांताक्रूझ पूर्व येथील व्हीएन देसाई रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आरोपी पवई येथील रहिवासी  आहे. त्याच्या  निष्काळजीपणामुळे एका महिलेचा मृत्यू  झाला. आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला  अटक करण्यात आली होती. हा अपघात इतका भीषण होता की, महिलेचा गंभीर दुखापत झाली.

 

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here