‘
‘ बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwaray Rai) यांच्या लग्नाला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, मागील काही महिन्यांपासून बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या यांच्यात वाद सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ऐश्वर्या ही मुलगी आराध्यासह वेगळी राहत असून अभिषेक हा आई-वडील अमिताभ-जया बच्चन यांच्यासोबत राहत असल्याचे म्हटले जात आहे. घटस्फोटासंबंधी एका पोस्टला अभिषेक बच्चने लाईक केल्यानंतर अभिषेक-ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता अभिषेक बच्चनच्या एका कृतीमुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात सारंकाही आलबेल सुरू असल्याचे म्हटले जात आहे. या अंदाजासाठी अभिषेकचे कार कनेक्शन आहे.
‘ई-टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिषेक बच्चनने एक नवीन कार खरेदी केली आहे. अभिषेकने आपला भाचा अगस्त्य नंदा आणि त्याची मैत्रीण शाहरुख खानची मुलगी सुहाना यांना नव्या कारमधून डिनर डेटला नेले होते. यावेळी सुहाना आणि अगस्त्य खूपच खूश दिसत होते.
अभिषेकच्या या नव्या कारबाबत सेलिब्रिटी फोटोग्राफर योगेन शाह याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. अभिषेकने आपल्या नव्या कारसाठी ऐश्वर्या रायच्या आवडीचा क्रमांक घेतला आहे. अभिषेकचा हा निर्णय ऐश्वर्यासाठी सरप्राईज असल्याचे म्हटले जात आहे.
योगेन शाह यांनी पुढे म्हटले की, अभिषेक बच्चनची नवीन कार ही ब्लॅक कलरची आहे. या कारच्या नंबर प्लेटवरील शेवटचे चार अंक 5050 आहे. हा क्रमांक ऐश्वर्याच्या आवडीचा आहे. याआधी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या व्हाईट कलरच्या ‘मर्सिडीज-बेंझ एस-क्लास’ या कारच्या नंबरप्लेटमध्येही 5050 समाविष्ट होता. या कारची विक्री करण्यात आली आहे. अभिषेक बच्चनचा वाढदिवस 5 फेब्रुवारी रोजी असतो. त्यामुळे आता, नंबर प्लेटवरील हा खास आकडा ऐश्वर्याच्या आवडीचा आहे की अभिषेकचा सिग्नेचर नंबर आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
ऐश्वर्या रायही गरोदर असताना तिला रुग्णालयातही 5050 ही नंबरप्लेट असलेल्या कारमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, बच्चन कुटुंबाकडून याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य करण्यात आले नाही. अभिषेकने खरंच ऐश्वर्याचा आवडता नंबर घेतला आहे की नाही? याबाबतही ठोस पुरावा नाही. नवीन कारमध्ये अभिषेक ऐशसोबत नसल्याने नेटिझन्स प्रश्न उपस्थित करत आहेत.
अनंत अंबानीच्या लग्नात बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्याची वेगवेगळी एन्ट्री
अनंत अंबानीच्या विवाह सोहळ्यात अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, श्वेता नंदा आणि नव्या, अगस्त्य हे एकत्र आले होते. तर,ऐश्वर्या राय आणि तिची लेक आराध्या हे त्यांच्यानंतर आले होते. लग्नाच्या हॉलमधील व्हायरल झालेल्या फोटोनुसार, ऐश्वर्या राय ही अभिषेक सोबत संवाद साधताना दिसली होती. त्यांच्यासोबत आराध्यादेखील होती. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये वाद नसल्याची अटकळ बांधण्यात आली.
पहा पोस्ट: