
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुष विभागांतर्गत आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात बुधवार दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन व उपचार देणार आहेत.
या शिबिरात आयुर्वेद विभागामार्फत मधुमेह (डायबिटीज) व स्थौल्य (लठ्ठपणा) या आजारांवर तपासणी व उपचार केले जाणार आहेत. तसेच होमिओपॅथी विभागामार्फत श्वसनाचे आजार व मुतखडा (किडनी स्टोन) यांसंदर्भात तपासणी व मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वृषाली राऊत तसेच आयुष विभागातील डॉ. सतीश देशमुख व डॉ. सुजाता हलके यांनी केले आहे. आटपाडी तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.


