आरक्षण सोडतीवर हरकतींसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत

0
248

माणदेश एक्सप्रेस न्यूज

आटपाडी /प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी तहसील कार्यालय, आटपाडी येथे संपन्न झाली. या सोडतीनुसार नगरपंचायतीच्या सर्व १७ प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय तसेच महिला व सर्वसाधारण गटांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

या आरक्षण सोडतीवर नागरिकांना हरकती व सूचना नोंदविण्याची संधी देण्यात आली असून, त्या हरकती मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करता येणार आहेत. हरकती अथवा सूचना संबंधित प्रभागाच्या मुख्यालयात किंवा निवडणूक कार्यालयात आटपाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी दाखल केलेल्या हरकती व सूचनांचा योग्य विचार करून आवश्यकतेनुसार सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीसाठी संबंधित नागरिकांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या सोडतीनंतर आता नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. अनेक संभाव्य उमेदवारांनी आरक्षणानुसार आपल्या प्रभागातील समीकरणांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

फोटो : आटपाडी नगरपंचायत लावणे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here