‘आपले सरकार’ पोर्टल पाच दिवस राहणार बंद, तुमची कामे लवकर करून घ्या;

0
161

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : आपले सरकार पोर्टलवरून काही शासकीय कागदपत्रांसंदर्भात तुमचे काम असेल, तर आजच करून घ्या. कारण पुढील पाच दिवस हे पोर्टल बंद राहणार आहे. महाराष्ट्र माहिती तंज्ञज्ञान महामंडळाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. १० ते १४ एप्रिल या काळात हे पोर्टल सर्वच सेवांसाठी बंद असणार आहे.

 

वेगवेगळ्या शासकीय सेवा आणि कागदपत्रांसाठी अर्ज करण्याची सुविधा असलेले आपले सरकार पोर्टल पाच दिवस बंद राहणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांच्या सेवा सर्वसामान्य नागरिकांना या पोर्टलवरून उपलब्ध करून दिल्या जातात. तांत्रिक कारणास्तव पाच दिवस पोर्टल ठेवले जाणार आहे.

 

आपले सरकार हे पोर्टल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार विकसित करण्यात आलेले आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत या उद्देशाने हे सुरू केलेले आहे.

 

नागरिक आपले सरकार पोर्टलवरून सर्वच कामासाठी लागणारी शासकीय प्रमाणपत्रे (जसे की उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे) मिळवण्यासाठी या पोर्टलवरून अर्ज करू शकतात. त्याचबरोबर शासकीय सेवांची माहितीही मिळवू शकतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here