
♈ मेष राशी (Aries)
आजचा दिवस अत्यंत शुभ. तुमच्या जीवनात आनंद आणि समाधानाचे क्षण लाभतील. जुन्या स्वप्नांची पूर्ती होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान प्राप्त होईल. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश मिळेल. व्यावसायिक दृष्टीने देखील फायदेशीर दिवस ठरेल. कुटुंबात नातेवाईकांच्या भेटीगाठी होऊन वातावरण प्रसन्न राहील.
♉ वृषभ राशी (Taurus)
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमचे वरिष्ठ इम्प्रेस कराल. पारस्परिक नातेसंबंध सुधारण्यासाठी आजचा दिवस योग्य. प्रियजनांसोबत वेळ घालवता येईल. आरोग्य उत्तम राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या व्यवहारात लाभ होईल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
♊ मिथुन राशी (Gemini)
आजचा दिवस काहीसा मानसिक तणावदायक ठरू शकतो. अनेक क्षेत्रांमध्ये आव्हानांचा सामना करावा लागेल. आर्थिक व्यवहारात दक्षता घ्या. कोणतेही मोठे निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचला. कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. घरातील जुनी रखडलेली कामे पूर्ण कराल. मोठ्यांकडून मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल.
♋ कर्क राशी (Cancer)
दिवसाची सुरुवात थोड्याशा तणावाने होईल. कामात काही अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. मात्र दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती अनुकूल होईल. तुमचे छंद जोपासण्याची संधी मिळेल. मनोरंजन आणि मौजमजेसाठी वेळ मिळेल. रचनात्मक कामांमध्ये लक्ष द्याल.
♌ सिंह राशी (Leo)
आजचा दिवस सिंह राशीसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. नवीन ओळखी होतील, संपर्क वाढतील. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. घरात शुभकार्य घडेल. प्रतिष्ठा आणि मान-सन्मानात वाढ होईल. आर्थिक लाभ संभवतो. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. जोडीदारासोबत खरेदी किंवा प्रवास होण्याची शक्यता आहे.
♍ कन्या राशी (Virgo)
कन्या राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा. कामात यश मिळेल. उत्पन्न वाढेल. आर्थिक स्थिती बळकट होईल. कुटुंबीयांसोबत आनंददायी वेळ घालवाल. परंतु बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे. प्रिय व्यक्तींसोबत खास क्षण घालवाल. विवाहीत लोकांसाठी विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता. वाहन अथवा घरगुती वस्तू खरेदीचा योग.
♎ तुळ राशी (Libra)
आज संयम ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा. नवीन काम सुरू करणे टाळावे. कौटुंबिक नातेसंबंध दृढ करण्यासाठी वेळ द्या. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. गरजू मित्र किंवा नातेवाईकांना मदत कराल. दिवस एकूणच स्थिर असेल.
♏ वृश्चिक राशी (Scorpio)
वृश्चिक राशीसाठी दिवस यशदायक. कामात चांगले परिणाम मिळतील. ध्येय गाठता येईल. छंद आणि आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून शुभ बातमी येईल. महत्त्वाचे काम पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत लाभ होईल. भावनांवर नियंत्रण ठेवावे, विचारपूर्वक प्रतिक्रिया द्याव्यात.
♐ धनु राशी (Sagittarius)
थोडासा गोंधळाचा दिवस. मानसिक तणाव जाणवेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. कुटुंब आणि नातेवाईकांचा पाठिंबा लाभेल. स्वतःसाठी वेळ मिळेल. व्यवसायात फायदेशीर व्यवहार होतील. कपडे व वाहनांवर खर्च वाढेल. दानधर्म किंवा समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हाल.
♑ मकर राशी (Capricorn)
लाभदायक दिवस. अडकलेली कामे मार्गी लागतील. नवीन काम सुरू करण्यास योग्य वेळ. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. पार्टनरसोबत वेळ घालवाल. किराणा व इलेक्ट्रिक व्यवसाय करणाऱ्यांना फायदा. सासरकडून सहकार्य मिळेल.
♒ कुंभ राशी (Aquarius)
एकंदरीत यशाचा दिवस. कामात प्रगती. आरोग्य व आर्थिक बाबतीत मात्र सावध राहा. मित्रांसोबत वेळ घालवाल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात. घर सजवण्यावर भर द्याल. खर्च वाढू शकतो.
♓ मीन राशी (Pisces)
आजचा दिवस खर्चिक. अनावश्यक खर्च टाळा. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम गरजेचे. जोडीदाराशी मतभेद टाळा. मुलांकडून सहकार्य मिळेल. खरेदीचा योग आहे.
🔚 टीप:
वरील राशीभविष्य हे विविध ज्योतिषीय स्रोतांवर आधारित आहे. हे फक्त माहितीपुरते असून कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला पाठबळ देण्याचा हेतू नाही.