
Mumbai Local Dance Viral Video: लोकल हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात लोकल ही मुंबईकरांसाठी जीव की प्राण आहे. मुंबई लोकल – फक्त प्रवासाची सोय नाही, तर रोज काहीतरी भन्नाट बघायला मिळण्याचं ठिकाण बनलंय. या लोकल ट्रेनमधील सर्वच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुणी लोकल ट्रेनमध्ये डान्स करताना दिसत आहे, जिला आता सगळे म्हणतायत झिंगालाला गर्ल. हो, सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक जण रीलस्टार व्हायच्या तयारीत आहे. पण, काही लोकांचा उत्साह इतका अफाट असतो की, ते थेट लोकल ट्रेनच्या डब्यातच शूटिंग सुरू करतात. असाच एक भन्नाट प्रकार घडलाय, जिथे एका तरुणीनं मुंबई लोकलमध्ये ‘झिंगालाला हू हू’ या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय आणि तिचा तो व्हिडीओ सध्या इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरतोय.
प्रवाशांनी डोळे विस्फारले, काहींनी मोबाईल काढला, काहींनी नुसतंच आश्चर्यचकित होऊन पाहिलं… ट्रेन सुरू होती, गर्दी होती, सगळं नेहमीसारखं वाटत होतं – आणि तेवढ्यात एका तरुणीनं अशा काही अतरंगी हालचाली सुरू केल्या की, सगळे जण स्तब्धच! बॅकग्राउंडला वाजत होतं ‘झिंगालाला हू हू’, आणि पुढच्याच क्षणी तिनं जो डान्स सुरू केला, तो पाहून तुम्हीही हसून हसून वेडे व्हाल. काय आहे या व्हिडीओचं खरं प्रकरण? नेमकं काय केलं तिनं लोकलमध्ये? वाचा आणि स्वतःच ठरवा – हे धमाल आहे की अतिरेक?
काही तासांतच त्यानं नेटकऱ्यांना वेडं केलं. तिच्या डान्स स्टेप्स फार काही हटके नसल्या तरी त्या डब्यातील प्रवाशांचे हावभाव मात्र भारीच! कोणी डोळे वटारून बघतंय, कोणी नजरेनं प्रश्न विचारतोय ‘हे काय चाललंय?’
लोकल डब्यात अचानक सुरू झालेला डान्स आणि पार्श्वभूमीला ‘बोलो बोलो झिंगालाला’ हे धमाकेदार भोजपुरी गाणं – हा सगळा मेळ असा काही जमलाय की, पाहणाऱ्याला हसू आवरणं शक्यच नाही. कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात – “ती नाचतेय; पण लाज आम्हाला वाटतेय”, “लोकलमध्ये नवा डान्स शो सुरू झालाय का?” अशा शेरोशायरीसुद्धा सुरू झाल्यात.
सार्वजनिक ठिकाणी असे व्हिडीओ शूट करणं कायद्यानं बेकायदा असलं तरी प्रशासनालाही हा रीलस्टारच्या अशा तऱ्हेवाईक कृत्यांचा सुळसुळाट थांबवणं कठीण जातंय. बाजार, मॉल, समुद्रकिनारा इथपर्यंत ठीक होतं; पण आता ट्रेनमध्येही या रीलस्टार्सचा गोंधळ वाढतोय.
तुमचं काय मत आहे या झिंगालाला डान्सबद्दल? मस्त वाटलं की, जास्तच झालं? कमेंटमध्ये नक्की सांगा – पण आधी व्हिडीओ बघा आणि हसून हसून पोट धरायला विसरू नका!