ऑफिससाठी निघालेल्या तरुणीने मरीन ड्राइव मध्ये उडी टाकून दिला जीव

0
205

या तरुणीने मरीन ड्राइव मध्ये उडी टाकून आपला जीव का दिला, याचे कारण अजून समजले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे.

काय आहे प्रकरण?
मुंबईच्या मरीन ड्राइव वर एका तरुणीने आत्महत्या केली असल्याची खबळजनक घटना समोर आली आहे. 23 वर्षीय तरुणीने समुद्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी घडली असून ममता कदम ही तरुणी अंधेरी मध्ये राहत होती. तिने समुद्रात उडी घेत आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना या घटनेची माहिती सोमवारी मिळली. ज्यानंतर पोलीस आणि फायर ब्रिगेडची टीम ने घटनास्थळी पोहचून तरुणीला बाहेर काढले. व रुग्णालयामध्ये नेले पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तसेच या तरुणीच्या कुटुंबाला या घटनेची माहिती देण्यात आली व मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला. तसेच पोलिसाना या तरुणीचा मोबाईल मिळाला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here