पुणेकर तरुणानं सांगितलं बायको कशी असावी; पाटी पाहून सर्वच थांबू लागले; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल

0
278

Viral puneri pati: कमीत-कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी तरुणानं भर चौकात अशी पाटी झळकवली की येणारा जाणारा प्रत्येकजण वाचून थांबू लागला. असं काय लिहलंय या पाटीवर तुम्हीच वाचा. एका पुणेकर तरुणानं भर चौकात पुणरी पाटी झळकवली आहे.

 

सध्या मुलांच्या लग्नाचा विषय फारच गंभीर होत चाललाय. हल्ली मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये निळ्या ड्रममध्ये मृतदेह सापडण्याच्या अनेक घटना घडल्याने निळ्या ड्रमाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान असाच एक वैतागलेला तरुण पोस्टर घेऊन थेट चौकात पोहचला आहे. या पोस्टरवर असं काही लिहलंय की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

 

भर चौकात तरुण हातात पोस्टर घेऊन उभा आहे. येणारे जाणारे सगळे लोक हे पुणेरी पोस्टर पाहून थांबत आहेत. आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय या पोस्टरवर ? तर या तरुणानं या पोस्टरवर, “बायको मोदकात सारण भरणारी असावी, ड्रममध्ये नवऱ्याला भरणारी नसावी” असा टोला लिहला आहे.

 

‘पुणेरी पाट्या’ या जगात प्रसिद्ध आहेत. कारण मोजक्या शब्दात जास्तीत जास्त माहिती या पाट्यांद्वारे दिली जाते. अशीच एक मजेशीर पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणे म्हटलं की अर्थात पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. दरम्यान आता आणखी एक पुणेरी पाटी सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ही पाटी पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here