१८ वर्षांनी पुन्हा आकाशात रंगणार अद्भुत दृश्य

0
807

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : आजचा दिवस धार्मिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज रात्री आकाशात एक विलक्षण आणि दुर्मीळ खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे – स्ट्रॉबेरी मून! यंदाचा स्ट्रॉबेरी मून हा विशेष मानला जात आहे, कारण अशा प्रकारचा चंद्र पुन्हा थेट २०४३ मध्येच दिसणार आहे.

 

काय आहे स्ट्रॉबेरी मून?
‘स्ट्रॉबेरी मून’ या नावाचा चंद्र प्रत्यक्षात स्ट्रॉबेरीसारखा गुलाबी रंगाचा नसतो. अमेरिकेतील नेटिव्ह अमेरीकन जमातींनी जून महिन्यात येणाऱ्या चंद्राला हे नाव दिलं, कारण या काळात स्ट्रॉबेरीचे पीक तयार होत असे. ज्येष्ठ पौर्णिमेला दिसणारा हा चंद्र विशेष तेजस्वी, मोठा आणि रंगीबेरंगी भासत असतो.

 

कधी आणि कुठे पाहता येईल?

दिवस: बुधवार, ११ जून २०२५

वेळ: संध्याकाळी ६.४८ नंतर

ठिकाण: संपूर्ण भारतभर उघड्या आकाशात

उपाय: घराच्या गच्चीवरून किंवा मोकळ्या मैदानावरून पाहता येईल

विशेष सूचना: दुर्बिण किंवा टेलिस्कोप वापरल्यास दृश्य अधिक स्पष्टपणे दिसेल

 

 

का आहे हा चंद्र विशेष?

हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आला असतो, त्यामुळे मोठा व तेजस्वी दिसतो

या घटनेची पुनरावृत्ती प्रत्येकी १८ वर्ष ६ महिन्यांनी होते

यंदाचा स्ट्रॉबेरी मून २०२५ मधील सर्वात तेजस्वी चंद्र आहे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here