टिळक रस्त्यावर भरधाव कार घुसली दुकानात; चालक अल्पवयीन

0
220

माणदेश एक्सप्रेस/पुणे : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट दुकानात शिरली. टिळक रोडवरील महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स दुकानात रविवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. क्रेन बोलावून कार बाहेर काढण्यात आली. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. शौकत कमलाकर बेळ (१९, हडपसर, काळेपडळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

 

अधिक माहितीनुसार, शौकत बेळ याचे रविवारी पहाटे तीनच्या सुमारास कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी फुटपाथवर चढली अन् महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक दुकानात शिरली. यात दुकानातील साहित्याचे नुकसान झाले. चालकासोबत त्याचे दोन मित्रदेखील गाडीत होते. चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता का, अशी विचारणा पोलिसांना केली असता त्यांनी चालकाने मद्यप्राशन केले नसल्याचे सांगितले.

 

चालकाने कार भरधाव चालवून ती दुकानात घातली. नंतर परस्पर क्रेन चालकाला बोलावून दुकानातील कार काढत असताना नागरिकांनी संबंधित दुकानदाराला माहिती दिल्याचे मेसेजमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.