![करोडपती](https://mandeshexpress.com/wp-content/uploads/2025/02/करोडपती.png)
आजही जगातल्या मोठ्या दुर्घटनांपैकी एक असलेली दुर्घटना म्हणजे टायटॅनिक जहाजाची जलसमाधी. या दुर्घटनेत असंख्य लोकांचं निधन झालं. याच दुर्घटनेवर आधारीत ‘टायटॅनिक’ सिनेमाही चांगलाच गाजला. सध्या गाजत असलेल्या KBC 16 मध्ये टायटॅनिक जहाजासंबंधी एक कोटी रुपयांचा प्रश्न विचारण्यात आला. परंतु उत्तर न देता आल्याने शाळकरी स्पर्धकाचं करोडपती बनण्याचं स्वप्न थोडक्यात हुकलं.
सध्या KBC 16 मध्ये लहान मुलांशी संबंधित विशेष भाग सुरु आहेत. या विशेष भागात ७ वी इयत्तेत शिकणारी इशिता गुप्ता सहभागी झाली होती. इशिताने तिच्या हुशारीच्या जोरावर ५० लाखांची रक्कम मिळवली. पण १ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर इशिताला देता आलं नाही.
प्रश्न होता की, आरएमएस टायटॅनिक एका हिमखंडाला धडकून बुडण्यापूर्वी, कोणत्या ब्रिटिश व्यापारी जहाजाने अटलांटिकमधील हिमखंडांबद्दल त्याला इशारा देण्याचा प्रयत्न केला? या प्रश्नाचं उत्तर इशिताला माहित नसल्याने तिने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
इशिता गुप्ताने खेळ सोडताना या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन A) एसएस ब्रिटनी असं निवडलं. पण हे उत्तर चुकीचं होतं. या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन डी) एसएस मेसाबा.
त्यामुळे इशिता गुप्ताने ५० लाख मिळवून खेळ सोडला. इशिता गुप्ता ही ७ वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. तिला भविष्यात हृदयरोग तज्ञ बनायचं आहे. तिला भविष्यात तिच्या प्रोफेशनच्या माध्यमातून लक्झरी विला, कार, बॅग आणि अन्य वस्तू खरेदी करण्याची इच्छा आहे. इशिताचं स्वप्न ऐकून बिग बींनी तिचं कौतुक केलं.