रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय; सणांच्या काळात येण्या-जाण्याच्या तिकीटावर सवलत

0
41

माणदेश एक्सप्रेस न्यूज :- सण-उत्सवांच्या काळात रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर आणि परवडणारा करण्यासाठी भारतीय रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. “राऊंड ट्रिप पॅकेज फॉर फेस्टिवल रश” नावाने नव्या योजनेची सुरुवात करत, रेल्वेने येण्या-जाण्याचे तिकीट एकाचवेळी बुक करणाऱ्या प्रवाशांना परतीच्या प्रवासात बेस प्राइसवर 20 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशात सण-उत्सवांच्या काळात तिकीटांसाठी होणारी मारामारी आणि प्रचंड गर्दी टाळण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळेल आणि गर्दीचे वेगवेगळ्या दिवसांमध्ये विभाजन होईल.

योजनेच्या अटी व कालावधी

  • येण्याचे तिकीट 13 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान असावे.

  • परतीचे तिकीट 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 दरम्यान असावे.

  • दोन्ही तिकीट एकाच नावाने, एकाच क्लासमध्ये आणि एकाच स्टेशनांदरम्यान बुक झालेले असावे.

  • दोन्ही तिकीट एकाच माध्यमातून (ऑनलाईन किंवा काउंटर) बुक करणे आवश्यक.

  • परतीचे तिकीट बुक करताना Advance Reservation Period (ARP) नियम लागू होणार नाही.

  • तिकीटांमध्ये बदल अथवा रिफंडची सुविधा उपलब्ध नाही.

  • Flexi Fare ट्रेन्सना ही सवलत लागू होणार नाही.

 

रेल्वेच्या मते, या योजनेत स्पेशल ट्रेन्सचाही समावेश आहे. मात्र रिटर्न तिकीट बुक करताना इतर कोणतीही सवलत, वाउचर, पास, PTO किंवा रेल्वे ट्रॅव्हल कूपन वापरता येणार नाही.

रेल्वे मंत्रालयाने या योजनेचा व्यापक प्रचार प्रेस, मीडिया आणि स्टेशनवरील घोषणांद्वारे करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्री वैष्णव यांनी आशा व्यक्त केली की, या निर्णयामुळे सणांच्या गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होईल आणि प्रवाशांना सहज तिकीट मिळेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here