पैसा कमवण्याचा भन्नाट जुगाड; पेट्रोल पंपासमोर हेल्मेट ठेवले अन्…; पाहा VIDEO

0
59

पैसा कमवणारे लोक कोणत्याही परिस्थितीत कसाही पैसा कमावू शकतात. त्यांना फक्त एक संधी हवी असते. त्या संधीचे सोनं करत ते दिवसाला हजारो, लाखोंची कमाई करू शकतात. असे लोक अगदी छोट्या गोष्टींमध्येही डोकं लावून जितका मिळेल तितका नफा कमवतात. विशेष म्हणजे ते पैसा कमवण्यासाठी असा काही भन्नाट जुगाड शोधतात, ज्यात खर्चही कमी येतो. अशाच प्रकारे एका व्यक्तीने पेट्रोल पंपाबाहेर पैसा कमवण्यासाठी भन्नाट जुगाड शोधून काढला आहे, ज्यातून तो रोज हजारोंची कमाई करतोय. या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

 

तुम्ही पेट्रोल पंपावर पाहिलं असेल, पेट्रोल- डिझेल भरणाऱ्या वाहनचालकांची मोठी गर्दी असते. याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने चक्क पेट्रोल पंपाजवळ आपला अनोखा व्यवसाय सुरू केला आहे. पेट्रोल पंपावर येणाऱ्या दुचाकी स्वारांना भाड्याने हेल्मेट देण्याचा व्यवसाय त्याने सुरू केलाय.

 

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस पेट्रोल पंपासमोर काही हेल्मेट घेऊन बसला आहे, जो लोकांना पाच रुपयांना हेल्मेट भाड्याने देत आहे. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपावर पेट्रोल दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा नियम लागू केला गेला असेल. पण, यातून एका व्यक्तीने पैसे कमवण्याचा नवा मार्ग शोधला आहे. या व्यक्तीने पैसा कमवण्यासाठी शोधलेला हा भन्नाट जुगाड आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

 

 

एका युजरने कमेंट करत लिहिले की, तो एक कुशल बिझनेस मॅन आहे. दुसऱ्या युजरने लिहिले – व्वा, किती भन्नाट व्यवसाय आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, आता फक्त पैसाच पैसा असेल. शेवटी एकाने लिहिले की, दोघेही त्यांचे काम करत आहेत, पण विश्वास आवश्यक आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here