अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार…! ‘या’ धर्मग्रंथाला साधा स्पर्शही करू शकली नाही आग

0
556

माणदेश एक्सप्रेस न्यूज|अहमदाबाद : अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण विमान अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, फक्त एकच प्रवासी जीवंत बचावला आहे. मात्र, या भीषण दुर्घटनेनंतर सापडलेल्या पवित्र भगवद्गीतेच्या सुरक्षित प्रतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 

AI-171 हे एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले. या भीषण अपघातात विमानाचा पूर्णपणे चक्काचूर झाला, स्फोट झाल्यामुळे धातू वितळले, आसनं, सामान जळून खाक झालं, पण एक गोष्ट शाबूत राहिली – भगवद्गीतेची एक प्रत.

 

बचावपथकाने दुर्घटनास्थळी शोधमोहीम सुरू केली असताना एका वाचलेल्या भगवद्गीतेच्या प्रतीकडे लक्ष वेधलं गेलं. ती कोणत्यातरी प्रवाशाची वैयक्तिक प्रत असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. सोशल मीडियावरही या घटनेचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती भगवद्गीतेची पाने दाखवतोय आणि ही प्रत कशी पूर्णपणे सुरक्षित आहे हे स्पष्ट होतंय.

 

घटनास्थळी उपस्थित असलेले बचावकर्मी आणि स्थानिक नागरिक या प्रसंगाला चमत्कारच मानत आहेत. सोशल मीडियावर यावर भावनिक प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी “ही देवाची कृपा” असल्याचे म्हटले आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here