केरळमध्ये भूस्खलनाची मोठी घटना! शेकडो लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती

0
397

केरळमधील वायनाड या जिल्ह्यात भूस्खलनाची भीषण घटना घडली आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार हे भूस्खलन वायनाडमधील मेप्पाडी या डोंगराळ भागात झाले असून यात शेकडो नागरिक बदल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी वेगान बचाकार्य केले जात आहे.

केंद्रीय यंत्रणांकडून बचाकार्यास सुरुवात
भूस्खलानाची ही घटना मेप्पाडी या भागात झाली आहे. सध्या केरळमध्ये पावसाने थैमान घातले आहे. याच पावसामुळे मेप्पाडी भागातील डोंगराळ भागात भूस्खलन झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार या ढिगाऱ्यात शेकडो नागरिक दबल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती होताच सरकारी बचाव यंत्रणा कामाला लागल्या आहेत. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही बचावकार्यात उडी घेतली आहे. आरोग्य मंत्रालयाने हेल्पलाईन नंबर जारी केले असून एका कंट्रोल रुमची स्थापना केली आहे.

आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले

बचावकार्यासाठी हवाईदलाचे Mi-17 आणि ALH हे दोन हेलिकॉप्टर्सही तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाने उभ्या केलेल्या कंट्रोल युनिटच्या मदतीने दुर्घटनाग्रस्तांची मदत केली जात आहे. उपचारासंबंधीची कोणतीही मदत लागल्यास 8086010833 आणि 9656938689 या दोन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वैथिरी, कालपट्टा, मेप्पाडी मनंथावडी या भागातील रुग्णालये तयार ठेवण्यात आली आहेत. भूस्खलनाची घटना घडताच आरोग्य कर्मचाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी लवकरच आणखी आरोग्य कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. तशी माहिती केरळचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे.

 

पहा पोस्ट :