लाडक्या बहिणींचा ‘महिला दिन’ होणार गोड ?, ‘या’ दिवशी मिळणार थेट 3000 रुपये

0
6875

माणदेश एक्स्प्रेस/मुंबई : महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. जानेवारी पर्यंतचे आत्तापर्यंतच्या हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र फेब्रुवारी महीना उलटून आता मार्च उलटला तरी फेब्रुवारीचे 1500 रुपये काही लाडक्या बहिणींच्या अद्याप खात्यात आलेले नाहीत. त्यामुळे फेब्रुवारीचे आणि आता मार्चचे पैसे, एकूण 3 हजार रुपये कधी मिळणार असा सवाल अनेक पात्र महिलांच्या मनात आहे.

 

 

8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारने लाडक्या बहिणींना भेट देण्याचे ठरवले आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी महिलांना फेब्रुवारीचा तर हप्ता मिळणार आहेच, पण तेव्हाच त्यांच्या खात्यात मार्च महिन्याचाही हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे मिळून, एकूण 3 हजार रुपये, एकत्र मिळणाक आहे, असे समजते. त्यामुळे लाडक्या बहिणींचा महिला दिनही यंदा गोड होण्याची चिन्हे आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here