डायबिटीज ते डोळ्यांच्या समस्येसाठी ‘हे’ फळ आहे बहुगुणी

0
247

सध्या हिवाळा कमी होऊन उन्हाळा वाढत चालला आहे. उन्हाळा ऋतूमध्ये लोक फळे खाणं जास्त पसंत करतात. त्यातीलच एक फळ म्हणजे किवी. हे फळ अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचं असतं. तुम्ही या फळाला दिवसातून किमान दोनदा खाल्याने तुमच्या शरीरात रक्ताची कमी जाणवत नाही. तसेच तुम्ही बऱ्याच गंभीर आजारांपासून लांब राहता. या फळांने नेमकं कोणते आजार दूर होतात हे आपण पुढील माहितीद्वारे समजून घेणार आहोत.

 

 

 

 

१. किवी फळाचे सेवन करण्याचे फायदे

किवी हे फळ इम्युनिटी बुस्टर आहे असे आपण सहज म्हणू शकतो. किवीचे सेवन केल्याने डेंग्यू, टायफाइट यांसारख्या समस्या तुम्हाला घेरत नाहीत. किंवा जर तुम्हाला यांपैकी कोणत्या आजाराची लागण असेल तर तुम्ही किवी या फळाचे सेवन करू शकता.

 

 

 

२. किवी फळामध्ये असणारे गुणधर्म

किवी या फळामध्ये अॅं टीऑक्सिडेंट, अॅंवटी इंफ्सेमेटर, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन बी, कॉपर, झिंक, पोटॅशियम आणि बीटा कॅरोटीन यांसारखे महत्वाचे तसेच शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व असतात. या फळाचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती सहज वाढू शकते. तसेच कोणत्याही आजारांपासून समस्यांपासून तुम्ही लांब राहू शकता.

 

 

 

३. शरीरातले रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर फळ

तुम्हाला माहीतच असेल किवीमध्ये आयरनचे प्रमाण सगळ्यात जास्त असते. हे फळ संत्र्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिनपेक्षा जास्त व्हिटॅमिने समृद्ध असते. त्यामुळे तुमच्या शरीरातले रक्त या फळाने वाढण्यास मदत होते.

 

 

 

४. डायबिटीजचे रुग्ण

किवी हे फळ संपुर्ण पोषक तत्वांनी परिपुर्ण असते. त्यामुळे अगदी डायबिटीजचे रुग्ण सुद्धा या फळाचे सेवन करू शकतात. त्याने या रुग्णांचे ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.

 

 

५. डोळ्यांच्या समस्या

किवी फळाचे सेवन केल्याने तुमच्या डोळ्यांची चमक वाढते. सध्याच्या डिजीटल युगात सगळेच स्क्रीनचा वापर अधिक काळ करत असतात. त्यामुळे तुम्हाला डोळ्यांच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here