
सध्या कोलेस्टेरॉल शरीरात कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होण्याची समस्या वाढताना दिसत आहे. शरीरातील कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण हृदयविकाराचा झटका तसेच स्ट्रोक या गंभीर आजारांना कारणीभूत ठरु शकते. शरीरातील या घातक घटकाचे प्रमाण कमी करण्यासाठी सकस आहार आणि नियमितपणे व्यायाम तर केलाच पाहिजे, याव्यतिरिक्त आल्याचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
1) गूड कोलेस्टेरॉल
कोलेस्टेरॉल हा रक्तात आढळणारा एक मेणासारखा पदार्थ आहे. शरीराच्या योग्य कार्यक्षमतेसाठी कोलेस्टेरॉल आवश्यक असते आणि अशा कोलेस्टेरॉलला गूड कोलेस्टेरॉल असे म्हणतात.
2) वाईट कोलेस्टेरॉल
जेव्हा रक्तात वाईट कोलेस्टेरॉल वाढू लागते, तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे रक्त प्रवाह मंदावतो किंवा थांबतो. अशातच, हृदयविकाराच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते.
3) सकस आहार आणि व्यायाम
सकस आहार आणि व्यायाम तसेच औषधांच्या सहाय्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी करता येते. तुम्ही देखील शरीरातील कोलेस्टेरॉलमुळे त्रस्त असाल, तर विना औषध उपचार कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी आलं अत्यंत फायदेशीर ठरतं.
4) ‘हायपोलिपिडेमिक’ घटक
आल्यामध्ये ‘हायपोलिपिडेमिक’ घटक आढळतो. हा घटक कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते.
5) आल्याचा रस
कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी आल्याचा रस अत्यंत लाभदायक ठरला आहे. शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करायचे असल्यास आलं रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात.
6) अँटीऑक्सीडेंट्स
आल्यामध्ये काही असे तत्त्वं आढळतात जे शरीरातील घातक पदार्थ काढून टाकतात. तसेच, आल्याच्या अर्कामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असणारे बरेच अँटीऑक्सीडेंट्स आढळतात.