
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील विठलापूर नजीक चारचाकी गाडीचा अपघात झाला. सदर अपघातात सुदैवाने चालक बचावला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आटपाडीकडून दिघंचीकडे हुंदाई कंपनीची क्रेटा (एम एच ४५ ए यु ८९१२) निघाली होती. सदरची गाडी विठलापूर गावच्या हद्दीमधील साळसिंगमळ्यांनजीक आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण निसटले.
भरधाव वेगाने असलेली गाडी रस्ता सोडून गेली. या झालेल्या अपघातात गाडीचे एअरबॅग उघडल्याने गाडीचा चालक बचावला असून त्याला किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर गाडीचे मोठे नुकसान झाले असून, गाडीचे चाक एक्सेसहित निघून गेले. अपघातानंतर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.