
माणदेश एक्सप्रेस न्युज/आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्याचा चारचाकी गाडीच्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रभू उर्फ प्रभाकर भोसले (वय ४५) असे अपघातात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आटपाडी नगरपंचायतीचे कर्मचारी असलेले प्रभू उर्फ प्रभाकर भोसले हे सफाई कर्मचारी व पाणीपुरवठा विभागात ते कामाला होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत धाम येथे आज दिनांक २४ रोजी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचे लिकेज काढण्याचे काम सुरु होते.
याठिकाणी प्रभू उर्फ प्रभाकर भोसले हा कर्मचारी या कामात सहभागी होता. काम संपल्यानंतर तो निघाला असता, या ठिकाणी उभ्या असलेल्या चारचाकी गाडीच्या समोर येवून खाली वाकून उभा असल्याने गाडी चालकाला दिसला नाही. त्यामुळे त्याची गाडीला धडक बसली. यामध्ये तो जागीच पडला.
यावेळी गाडीचालकाने प्रभू उर्फ प्रभाकर भोसले याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. सदर अपघाताची नोंद आटपाडी पोलिसात अद्याप पर्यंत झालेली नव्हती.