
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा आयोजित करण्याबाबत केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम और खेल मंत्रालय युवा कार्यक्रम विभागाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता जिल्हा परिषद कार्यालय सांगली येथील सभागृहात उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थितांना आभासी पध्दतीने संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम संपल्यानंतर सकाळी 8 वाजता जिल्हा परिषद सभागृह – राममंदिर चौक – स्टेशन चौक मार्गे छत्रपती शिवाजी पुतळा (तरूण भारत मंडई, मारूती चौक) या ठिकाणापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. तरी या पदयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.